Posts

Showing posts from September, 2018

प्रख्यात व सामान्य मंडळातील दुवा

Image
      देव हा सगळ्यांचा एकच असला तरी ही उत्सव मंडळामध्ये बऱ्याच चढाओढी असतात. परंतु प्रख्यात गणपती मंडळे व सामान्य विभागातील मंडळात बरीच वेगळी मजा असते. प्रख्यात मंडळांमध्ये मोठया मुर्त्या ,मोठ मोठे देखावे, भली मोठी लोकांची गर्दी व त्या गर्दीतील लोकांना सांभाळायला कार्यकर्ते असतात. संपूर्ण दहा दिवसात त्यांचा वेळ दिवस रात्र लोकांना फक्त रांगेत दर्शनासाठी सोडणे व बाहेर काढणे यातच जातो.         परंतु लहान मंडळात बरीच मज्जा असते. स्वतः सगळ्यांनी एकत्र  मिळून हाताने रंगीबेरंगी ओढण्या, कागदी फुले, फुगे व इतर डेकॉरेशन मटेरियलने गणपतीचा मंडप सजवला जातो. तसेच अंदाजपत्रक कमी असला तरी प्रत्येक दिवस हा वेगवेगळ्या कार्यक्रमात घालवतात. त्यातल्या त्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत जास्तीत जास्त लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांचा असतो.लहान मुलांसाठी कार्यक्रम करायचे व पारितोषिके दयायचे,महिलांचे सांस्कृतीक कार्यक्रम करायचे व प्रत्येकीला काही आपले सूप्त गुण दाखवण्याची संधी प्राप्त करून द्यावी. हळदीकुंकू,महाआरती, सत्यनारायणाची पुजा यामुळे ही ल...