प्रख्यात व सामान्य मंडळातील दुवा

      देव हा सगळ्यांचा एकच असला तरी ही उत्सव मंडळामध्ये बऱ्याच चढाओढी असतात. परंतु प्रख्यात गणपती मंडळे व सामान्य विभागातील मंडळात बरीच वेगळी मजा असते. प्रख्यात मंडळांमध्ये मोठया मुर्त्या ,मोठ मोठे देखावे, भली मोठी लोकांची गर्दी व त्या गर्दीतील लोकांना सांभाळायला कार्यकर्ते असतात. संपूर्ण दहा दिवसात त्यांचा वेळ दिवस रात्र लोकांना फक्त रांगेत दर्शनासाठी सोडणे व बाहेर काढणे यातच जातो.
        परंतु लहान मंडळात बरीच मज्जा असते. स्वतः सगळ्यांनी एकत्र  मिळून हाताने रंगीबेरंगी ओढण्या, कागदी फुले, फुगे व इतर डेकॉरेशन मटेरियलने गणपतीचा मंडप सजवला जातो. तसेच अंदाजपत्रक कमी असला तरी प्रत्येक दिवस हा वेगवेगळ्या कार्यक्रमात घालवतात. त्यातल्या त्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत जास्तीत जास्त लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांचा असतो.लहान मुलांसाठी कार्यक्रम करायचे व पारितोषिके दयायचे,महिलांचे सांस्कृतीक कार्यक्रम करायचे व प्रत्येकीला काही आपले सूप्त गुण दाखवण्याची संधी प्राप्त करून द्यावी. हळदीकुंकू,महाआरती, सत्यनारायणाची पुजा यामुळे ही लोक एकत्र येतात. मंडळ लहान असूनही काहीतरी विषयावर उदा. झाडे लावा , झाडे जगवा, पर्यावरणाचे महत्व किंवा प्लास्टिकचा वापर टाळा, कापडी पिशव्या भेट देऊन लोंकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न मंडळाचा असतो. 
         प्रख्यात मंडळात मोठेमोठे सेलेब्रिटी येतात त्यांना आधी vip म्हणून थेट  दर्शन दिले जाते. व सामान्य लोकांना तासंतास उभे राहून रांगेत दर्शन दिले जाते. असा हा भाविकांमध्ये मंडळाकडून भेदभाव केला जातो. मोठ्या मंडळात गर्दी मध्ये चोऱ्या होतात. गैर वर्तन होताना दिसून येते. व सामान्य मंडळात असे दिसून येत नाही. व सामान्य मंडळ गणपतीचे दर्शन भाविकांना व्यवस्थितपणे देतात.
          अशा प्रकारे प्रख्यात व सामान्य मंडळातील गणेशउत्सव हा वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो. यावरून अश्या दोन्ही मंडळात वेगवेगळ्या प्रकारे दुवा निर्माण झालेला दिसून येतो .

Comments

Popular posts from this blog

स्वच्छता ही काळाची गरज

मोबाईल शाप की वरदान

संगणक : गरज की हव्यास ?