मोबाईल शाप की वरदान

     एकविसाव्या शतकात वावरत असताना असे एक माध्यम निर्माण झाले की ज्यामुळे माणूस एकमेकांच्या संपर्कात राहू शकला. ते माध्यम म्हणजे मोबाइल. मोबाईल फोनचा जन्म झाला आणि जगात मोठी संपर्क क्रांती निर्माण झाली. जगात बघता बघता गरीब-श्रीमंत , मालक-कामगार , स्त्री-पुरुष सर्वानीच या मोबाईलचा वापर करण्यात सुरवात केली.               पूर्वीच्या काळात एकमेकांशीं संपर्क साधण्यासाठी पत्राचा उपयोग केला जायचा. पण आजच्या काळात मोबाईल या माध्यमांमुळे आपण लगेच संपर्क साधू शकतो.तसेच मोबाईल मध्ये फक्त संपर्कच नाही तर त्यामध्येही एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी आणखी माध्यमे निर्माण करण्यात आले आहे उदा. व्हाट्सअँप ,फेसबुक ,इंस्टाग्राम इत्यादी.
     आजच्या काळात मोबाईलचा वापर हा श्राप की वरदान ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मोबाईलमुळे आजवर जगात क्रांती झाली हे खरच! खर तर मोबाईल वरदानच ठरावा. कधी आपल्या माणसांना , मित्र परीवाराला एकत्रित आण्ण्यासाठी कींवा आपल्या महत्वाच्या कामासाठी मोबाईलमुळे संपर्क साधता येतो.
     मोबाईल जेवढा फायदेशीर तेवढाच घातक ही ठरु शकतो. जसे सतत मोबाईलवर विनाकारण वेळ वाया घालवणे तसेच आवाजाची मर्यादा, किती बोलावे व किती बोलु नये  याचे भान असावे. त्यामुळे मेंदु व हृदयाला ध्वनी लहरींचा त्रास होणार नाही. अतिरेकी वापरांमळे वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. कानाचे विकार होण्याची शक्यता असते.रस्त्याने चालताना, वाहणे चालवताना मोबाईलचा वापर टाळायला पाहिजे.
आज मोबाईलच्या वापरामुळे खुप ठिकाणी अपघात होत असताना दिसतात.म्हणून मोबाईलच्या अतिवापरामुळे भविष्यात कोणाला त्रास होणार नाही ह्याची काळ्जी आपणच घ्यायला हवी. व ज्या ठिकाणी मोबाईल या माध्यमाचा उपयोग आहे अश्या ठिकाणीच त्या माध्यमाचा वापर केला पाहिजे.         पण अजून देखील मोबाईल  शाप की वरदान ? हा प्रश्न सोडवता आला नाही.

Comments

  1. Really good👍 keep it up!!

    ReplyDelete
  2. What a great chaitu how cute!

    ReplyDelete
  3. Replies
    1. This very good essay wa!wa•••••!

      Delete
  4. Liked your nibhand ,it can be a guidance to nowadays children

    ReplyDelete
  5. Very very good speech 5on5👏👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्वच्छता ही काळाची गरज

संगणक : गरज की हव्यास ?