स्वच्छता ही काळाची गरज

     आपण म्हणतो स्वच्छता..... स्वच्छता...... म्हणजे काय ?
माणसाने स्वच्छतेची सुरुवात ही आपल्या स्वतःपासून केली पाहिजे. आजच्या काळात स्वच्छता ही काळाची गरज बनली आहे. प्लास्टिकचा अतिवापर , सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकणे , बेशिस्तपणे कचऱ्याच्या पेटीत कचरा न टाकता कचरा इतर ठिकाणी फेकलेला असतो. सुका व ओल्या कचऱ्याचे वर्गीकरण न करणे. या सर्व कारणांमुळे अस्वच्छता पसरते.
     स्वच्छता हे परमेश्वराचे दुसरे नाव आहे. असे सांगणारे महात्मा गांधी , हातात झाडु घेऊन गल्ली गल्लीत स्वच्छता करणारे संत गाडगेबाबा, व सेनापती बापट यांसारख्या समाज सुधारकांची परंपरा असतानाही आजवर देखील भारतीयांना काही स्वच्छतेचे महत्व हे पुरेसे पटलेले दिसत नाही. याची साक्ष देणारी उदाहरणे आपल्याला बघायला मिळतात. तसेच देशाची राजधानी म्हणून ओळखली जाणारी मुंबई ही अस्वच्छ दिसून येत आहे. परंतु दुर्दैव असे की याची जाणीव कोणाला नाही ! 
     सरकारी रुग्णालयांमध्ये उभे ही राहवत नाही कारण तेथे जागोजागी अस्वच्छता पसरलेली असते. या अस्वच्छतेचा परिणाम रुग्णांना होतो. यामुळे त्यांना आजाराला सामोरे जावे लागते. तसेच उघड्यावर शौच करणार्यांची संख्या आजही वाढत आहे , रेल्वे स्थानके , चौपाटी , बालोद्यान हे देखील अस्वच्छतेची केंद्रे बनत चाली आहे. देशातील काही शाळांमध्ये मुलांनसाठी शाळेचे स्वतंत्र शौचालये नाहीत त्यामुळे सार्वजनिक शौचालयांचाच वापर शाळकरी मुलांना करावा लागतो. आणि या अस्वच्छतेचा परिणाम म्हणजेच डेंग्यु , मलेरिया , टायफॉइड , कॉलरा , कावीळ यांसारख्या आजारांना मानवालाच सामोरे जावे लागते.
     म्हणूनच या सर्व अस्वच्छतेला नाहिसे करण्याची जबाबदारी आपल्या देशातील प्रत्येक नागरिकांची आहे. स्वच्छता करण्याची जबाबदारी ही फक्त शासन कींवा सफाई कामगार यांचीच आहे हा विचार आपण सोडला पाहिजे. आपणच अस्वच्छतेला मात करून स्वच्छतेच्या दिशेकडे वळले पाहिजे. 
           "परिसर स्वच्छ ठेवाल , तर निरोगी व्हाल"

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मोबाईल शाप की वरदान

संगणक : गरज की हव्यास ?