Posts

Showing posts from October, 2018

वृत्तपत्र हा जणु एक आधारचं.

Image
      गजबजलेलं शहर असो की  ग्रामीण भाग असो आजवर सगळीकडेच वृत्तपत्रे जाऊन पोहचली आहे. आपल्या जीवनात जसे टी. व्ही. , मोबाईल , संगणक ही प्रसारमाध्यमे जशी महत्वाची आहेत . तसेच वृत्तपत्र हे देखील एक प्रसारमाध्यमांचा अविभाज्य महत्वाचा भाग आहे. माहिती देणे , मार्गदशन करणे आणि मनोरंजन करणे अशी वृत्तपत्राची कार्य बनली गेली आहे. समाजाच्या जडणघडणीत वृत्तपत्रासारखं सुलभ आणि जनसामान्यांपर्यंत जाऊन पोहचणारं अन्य साधन नाही.      वृत्तपत्राचं कार्य म्हणजे राजकीय घडामोडी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचणे. व जनतेला जागृत ठेवणं हे आहे. ही कार्ये खूपच व्यापक बनली गेली आहेत. राजकीय घडामोडींबरोबरच वैंज्ञानिक , वैचारिक , सामाजिक आणि संस्कृतीक परिवर्तनाला हातभार लावणं हेही एक वर्तमानपत्राचं महत्वाचं कार्य ठरलं. अर्थव्यवस्था , साहित्य , लोकशिक्षण , समाजसुधारणा , इतिहास , धर्माचं तत्वज्ञान अशा अनेक अंगांनी वर्तमानपत्रांचं कार्य विस्तारत गेलं आहे. काही अभ्यासु  व्यक्तींचे विविध लेखन वृत्तपत्रात सतत येत असते त्यामुळे सामान्य वाचकांना अनेक नवनवीन माहिती मिळू लागते. व...

स्वच्छता ही काळाची गरज

Image
     आपण म्हणतो स्वच्छता..... स्वच्छता...... म्हणजे काय ? माणसाने स्वच्छतेची सुरुवात ही आपल्या स्वतःपासून केली पाहिजे. आजच्या काळात स्वच्छता ही काळाची गरज बनली आहे. प्लास्टिकचा अतिवापर , सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकणे , बेशिस्तपणे कचऱ्याच्या पेटीत कचरा न टाकता कचरा इतर ठिकाणी फेकलेला असतो. सुका व ओल्या कचऱ्याचे वर्गीकरण न करणे. या सर्व कारणांमुळे अस्वच्छता पसरते.      स्वच्छता हे परमेश्वराचे दुसरे नाव आहे. असे सांगणारे महात्मा गांधी , हातात झाडु घेऊन गल्ली गल्लीत स्वच्छता करणारे संत गाडगेबाबा, व सेनापती बापट यांसारख्या समाज सुधारकांची परंपरा असतानाही आजवर देखील भारतीयांना काही स्वच्छतेचे महत्व हे पुरेसे पटलेले दिसत नाही. याची साक्ष देणारी उदाहरणे आपल्याला बघायला मिळतात. तसेच देशाची राजधानी म्हणून ओळखली जाणारी मुंबई ही अस्वच्छ दिसून येत आहे. परंतु दुर्दैव असे की याची जाणीव कोणाला नाही !       सरकारी रुग्णालयांमध्ये उभे ही राहवत नाही कारण तेथे जागोजागी अस्वच्छता पसरलेली असते. या अस्वच्छतेचा परिणाम रुग्णांना होतो. यामुळे त्यांना आज...

संगणक : गरज की हव्यास ?

Image
'कॉम्प्युटर डोळे तपासून मिळतील.' 'कॉम्प्युटरवर भविष्य मिळेल'     अशा जाहिराती करणाऱ्या पाट्या आजवर शहरात वाचायला मिळतात आणि असे वाटते की आजकाल 'संगणक' किती महत्त्वाचा आहे ते या यंत्रानी मानवाला खूपच प्रगतीवर नेल आहे.      संगणकामुळे काही बाबतीत पैशांची बचत होते व वेळेची मात्र नक्कीच बचत होते. संगणक येणापूर्वी रेल्वे स्थानकांवर ,बस स्थानकांवर , सिनेमागृहात तासनतास तिकीटांसाठी तात्काळत उभे राहावे लागायचे. आता मात्र तसे नाही. आपल्याला ज्या गाडीने किंवा बसने जायचे आहे त्या गाडीत जागा मिळेल की नाही हे संगणक चट्कन सांगतो. शिवाय संगणकाद्वारे हवी ती माहिती साठवूनही ठेवता येत.       बेंका , मोठेमोठ्या कंपन्या, कारखाने, रुग्णालय अशा सर्व क्षेत्रात संगणकाचा वापर सुरू आहे. त्याचबरोबर दैनंदिन व्यवहारातही उपयोग होतो. लहान मुलांसाठी चित्र, कार्टून फ्लिम्स , प्रोजेक्टसाठी माहिती मिळवणे हेही काम संगणक करतो.       जगाच्या पाठीवर कोण्त्याही हालचाली संगणकद्वारे आपण पाहु शकतो. क्रीडा क्षेत्रातील काही खेळांचे सामने, जागतिक पातळीवरील सामने सहज ...

मोबाईल शाप की वरदान

Image
     एकविसाव्या शतकात वावरत असताना असे एक माध्यम निर्माण झाले की ज्यामुळे माणूस एकमेकांच्या संपर्कात राहू शकला. ते माध्यम म्हणजे मोबाइल. मोबाईल फोनचा जन्म झाला आणि जगात मोठी संपर्क क्रांती निर्माण झाली. जगात बघता बघता गरीब-श्रीमंत , मालक-कामगार , स्त्री-पुरुष सर्वानीच या मोबाईलचा वापर करण्यात सुरवात केली.               पूर्वीच्या काळात एकमेकांशीं संपर्क साधण्यासाठी पत्राचा उपयोग केला जायचा. पण आजच्या काळात मोबाईल या माध्यमांमुळे आपण लगेच संपर्क साधू शकतो.तसेच मोबाईल मध्ये फक्त संपर्कच नाही तर त्यामध्येही एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी आणखी माध्यमे निर्माण करण्यात आले आहे उदा. व्हाट्सअँप ,फेसबुक ,इंस्टाग्राम इत्यादी.      आजच्या काळात मोबाईलचा वापर हा श्राप की वरदान ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मोबाईलमुळे आजवर जगात क्रांती झाली हे खरच! खर तर मोबाईल वरदानच ठरावा. कधी आपल्या माणसांना , मित्र परीवाराला एकत्रित आण्ण्यासाठी कींवा आपल्या महत्वाच्या कामासाठी मोबाईलमुळे संपर्क साधता येतो.      मोबाईल जेवढा ...