वृत्तपत्र हा जणु एक आधारचं.
गजबजलेलं शहर असो की ग्रामीण भाग असो आजवर सगळीकडेच वृत्तपत्रे जाऊन पोहचली आहे. आपल्या जीवनात जसे टी. व्ही. , मोबाईल , संगणक ही प्रसारमाध्यमे जशी महत्वाची आहेत . तसेच वृत्तपत्र हे देखील एक प्रसारमाध्यमांचा अविभाज्य महत्वाचा भाग आहे. माहिती देणे , मार्गदशन करणे आणि मनोरंजन करणे अशी वृत्तपत्राची कार्य बनली गेली आहे. समाजाच्या जडणघडणीत वृत्तपत्रासारखं सुलभ आणि जनसामान्यांपर्यंत जाऊन पोहचणारं अन्य साधन नाही.
वृत्तपत्राचं कार्य म्हणजे राजकीय घडामोडी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचणे. व जनतेला जागृत ठेवणं हे आहे. ही कार्ये खूपच व्यापक बनली गेली आहेत. राजकीय घडामोडींबरोबरच वैंज्ञानिक , वैचारिक , सामाजिक आणि संस्कृतीक परिवर्तनाला हातभार लावणं हेही एक वर्तमानपत्राचं महत्वाचं कार्य ठरलं. अर्थव्यवस्था , साहित्य , लोकशिक्षण , समाजसुधारणा , इतिहास , धर्माचं तत्वज्ञान अशा अनेक अंगांनी वर्तमानपत्रांचं कार्य विस्तारत गेलं आहे. काही अभ्यासु व्यक्तींचे विविध लेखन वृत्तपत्रात सतत येत असते त्यामुळे सामान्य वाचकांना अनेक नवनवीन माहिती मिळू लागते. व सामान्य वाचक तो वृत्तपत्र अतिशय आवडीने वाचत बसतो.
वृत्तपत्रांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती दिसतात. आजवर जगात काय घडते . मग ते राजकीय असो वा सामाजिक घडामोडी असू ह्यांचे जाहिरात वृत्तपत्रात छापील झालेले आपल्याला दिसते. वस्तूंच्या किमतीत चढउतार , नवे विचार , वैज्ञानिक घडामोडी , नाटक , सिनेमा , कला , क्रीडा , राशी भविष्य , दैनंदिन कार्यक्रम , जाहीर नोटीसा , नोकरीची जाहिरात , जागेसाठी(बिल्डींग्सची) जाहिरात, होम लोन जाहिरात , बॅंकेचे जाहिरात , दूरदर्शनवरील मालिकांचे जाहिरात , हिरो हेरोइनचे जीवनावरील जाहिरात , आकाशवाणीवरील दैनंदिन कार्यक्रम , रोजचं पंचांग , विविध ठिकाणी होणाऱ्या स्पर्धा तसेच विरंगुळया बरोबरच ज्ञानात भर घालणारी कोडी , संस्था आणि सेवाभावी कार्यकर्ते यांचा परिचय , सोन्याच्या ज्वेलर्सचे जाहिरात असे खूप काही आपल्याला वर्तमानपत्रातून वाचायला मिळत व आपल्या पर्यंत अधिक माहिती पोहचत असते.
वृत्तपत्रांबरोबर अनेक मासिकांचा उदय झाला . व या मासिकांचा प्रभाव देखील प्रसारमाध्यमांमध्ये येत आहे. आज अनेक वाचक वर्तमानपत्रातील बातम्यांवरून आपले मत बनवितात ही वस्तुस्थिती आहे. वृत्तपत्र हा सामाजिक जीवनाचा जनु आरसाच बनला आहे. व सामाजिक परिवर्तनांच ते एक प्रभावी साधन आहे . वृत्तपत्रांची जेवढी निकोष वाढ होईल तेवढी वृत्तपत्र समाजाला अधिक माहिती व मार्गदर्शन मिळेल असे माझे मत आहे .
आजच्या तारखेला इतर माध्यमांपेक्षा वृत्तपत्र हे प्रसारमांध्यम अतिशय महत्वाचं माध्यम बनले आहे. मोबाईलद्वारे कितीही फेसबुक , व्हाटसप , ट्विटर व इतर बातम्यांचे एप यांच्या माध्यमांतून देश , परदेशातील माहिती आपल्या पर्यंत लगेचच पोहचते. परंतु मोबाईल मधले असे काही एप वयस्कर लोकांनां लगेचच हाताळता येत नाही म्हणून त्यांना त्यांचा विश्वास व आधार वृत्तपत्र वाटतो. ह्या माध्यमांचा शेवट कधी होणारचं नाही कारण हे माध्यम आपल्या सामाजिक जीवनाचा एक जणु भागच आहे.
Comments
Post a Comment