वृत्तपत्र हा जणु एक आधारचं.

गजबजलेलं शहर असो की ग्रामीण भाग असो आजवर सगळीकडेच वृत्तपत्रे जाऊन पोहचली आहे. आपल्या जीवनात जसे टी. व्ही. , मोबाईल , संगणक ही प्रसारमाध्यमे जशी महत्वाची आहेत . तसेच वृत्तपत्र हे देखील एक प्रसारमाध्यमांचा अविभाज्य महत्वाचा भाग आहे. माहिती देणे , मार्गदशन करणे आणि मनोरंजन करणे अशी वृत्तपत्राची कार्य बनली गेली आहे. समाजाच्या जडणघडणीत वृत्तपत्रासारखं सुलभ आणि जनसामान्यांपर्यंत जाऊन पोहचणारं अन्य साधन नाही. वृत्तपत्राचं कार्य म्हणजे राजकीय घडामोडी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचणे. व जनतेला जागृत ठेवणं हे आहे. ही कार्ये खूपच व्यापक बनली गेली आहेत. राजकीय घडामोडींबरोबरच वैंज्ञानिक , वैचारिक , सामाजिक आणि संस्कृतीक परिवर्तनाला हातभार लावणं हेही एक वर्तमानपत्राचं महत्वाचं कार्य ठरलं. अर्थव्यवस्था , साहित्य , लोकशिक्षण , समाजसुधारणा , इतिहास , धर्माचं तत्वज्ञान अशा अनेक अंगांनी वर्तमानपत्रांचं कार्य विस्तारत गेलं आहे. काही अभ्यासु व्यक्तींचे विविध लेखन वृत्तपत्रात सतत येत असते त्यामुळे सामान्य वाचकांना अनेक नवनवीन माहिती मिळू लागते. व...